thumb

मान्यवरांचे मनोगत

मतदार संघातील कामासाठी माझ्याकडे सतत पाठपुरावा करणारे आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे यांना प्रचंड मताने निवडुन देणाऱ्या वैजापूर- गंगापूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. आमदार बोरनारे यांनी आतापर्यंत स्वतः साठी काहीच मागितले नाही. जे मागितले ते तालुक्यातील जनतेसाठीच. कधी कुणाची तक्रार नाही, कोणाशी वाद नाही व कोणाशी स्पर्धाही न करता स्वतःशी स्पर्धा करणारा हा आमदार म्हणजे आमच्या पक्षातील हिरा आहे.

आमदार बोरनारे यांचा थेट संपर्क तळागाळातील जनतेसोबत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या बांधावर काय समस्या आहे हे मला समजायला मदत होते. वैजापुर-गंगापूर विधानसभा क्षेत्रातील रस्ते, पाणी, विज, आरोग्य, शिक्षण, कारखाना, एमआयडीसी, धार्मिक क्षेत्रांचा विकास या सारख्या अनेक कामासाठी बोरनारे स्वतः मंत्रालयात प्रत्येक विभागात पाठ पुरावा करतात. माझ्या कार्यकाळात मी आमदार बोरनारे यांचे दोन रुप बघितले. एक म्हणजे "तालुक्यात" असतांना कार्यकर्त्यात रमणारा सच्चा "मित्र" (शिवसैनिक) आणि "मुंबईत असतांना प्रचंड मेहनत करणारा आमदार".

तालुक्यातील सर्व समाजघटकांचा विचार करुन सर्वांना समानतेची वागणुक देणारे व विधानसभेत तालुक्याची मजबुत बाजु मांडणारे बोरनारे तालुक्याच्या प्रश्नाबाबत खुप गंभिरपणे विचार करुन त्यावर मार्ग काढत असतात. मी माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदार संघात भरभरुन निधी देण्याचा प्रयत्न केला.

उर्वरित कामेदेखील भविष्यात मार्गी लागणार आहे त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची मला आणि आमदार बोरनारे यांना आवश्यकता आहे. जसा मी वैजापूर-गंगापूर मतदार संघाला निधी देण्यासाठी कमी पडलो नाही तसेच आपणही आमदार रमेश बोरनारे यांना मतदानरुपी आशिर्वाद द्यायला कमी पडणार नाही. अशी खात्री बाळगतो.

सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र!!

आपलाच

श्री. एकनाथ संभाजी शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
thumb

मान्यवरांचे मनोगत

मी उद्योग मंत्री झाल्यापासुन आमदार श्री. रमेश बोरनारे यांची एकही अशी भेट नाही कि ज्यात त्यांनी रोटेगाव एमआयडीसीचा विषय घेतला नाही. मतदार संघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि पर्यायाने तालुक्यात नवनवीन उद्योग आणण्यासाठी रोटेगाव एमआयडीसी कशी महत्वाची आहे हे मला पटवुन देतांना आमदार बोरनारे यांच्या मनात तालुक्यातील तरुणांसाठी किती आपुलकी आहे याचा मी साक्षीदार आहे.

नवीन उद्योग उभा राहतानाच स्थानिकांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी एकदा वैजापूर येथे, एकदा संभाजीनगर येथे व दोनदा मुंबई येथे शेतकऱ्यांशी चर्चा घडवुन आणली. एखाद्या प्रकल्पाची फक्त मागणी करणं वेगळं आणि तो प्रत्यक्षात मंजुर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे वेगळं. आमदार बोरनारेंनी स्थानकांशी सुसवांद साधुन यावर मार्ग काढला व परिपूर्ण प्रस्ताव सादर केला. लवकरच लाभार्थ्यांना मोबदला देऊन एमआयडीसी चालु होईल अशी मी ग्वाही देतो. आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नासाठी एवढ्या टोकाचे प्रयत्न करणारा हा माझा सहकारी वैजापूर- गंगापूर विधानसभा क्षेत्राचा नक्कीच कायापालट करणार यात आजिबात शंका वाटत नाही. आमदार रमेश बोरनारे सरांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र!!

आपलाच

श्री. उदय सामंत
मंत्री, महाराष्ट्र राज्य
thumb

वैजापूरचे मा.आमदार प्रा.रमेश पाटील बोरनारे यांचे जनतेला आवाहन

एक सामान्य शिवसैनिक ते आमदार या पदापर्यंत मला पोहोचवणाऱ्या लाखो मतदारांना सर्वप्रथम माझा सप्रेम जय महाराष्ट्र..! शिवसेना राजकारणातील "र" चाही ज्या घरात स्पर्श झालेला नव्हता त्याच घरातील व्यक्तीला आमदार पदी बसवून तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली हे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

त्यामुळे आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे २४ तास जनतेच्या सेवेत राहणारा सेवेकरी व्हायचं आहे अशी मी मनाशी खुणगाठ बांधली. मागील ७० वर्षा पासून तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या विभागातून निधी मंजूर करून आणला आणि संबंधित कामे पूर्ण केली. याचे प्रत्यक्ष साक्षीदार आपण सर्वच सुजान नागरिक आहात. ज्या दिवशी आपण सर्वांनी मला आमदार पदी बसविले अगदी त्याच दिवसापासून युवकांच्या रोजगारासाठी आवश्यक असणारे रोटेगाव एमआयडीसी आणि साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखंड प्रयत्न सुरु केले.

आपल्या एमआयडीसीसाठी प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी १६८ कोटी रुपये जमा देखील झाले. वैजापूर शहरातील सर्वधर्मीय श्रद्धास्थानांना निधी उपलब्ध करून दिला. तसेच शहरातील रस्ते, पाणी, वीज,, मंगल कार्यालय, सार्वजनिक सभागृहे, न्यायालय इमारत, पोलीस वसाहत, तहसिल इमारत, अभ्यासिका, नाट्यगृह, तसेच शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या अनेक कामांचा पाठपुरवा तत्कालीन नगरविकास मंत्री सन्मानणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कडे केला. सन्मानणीय शिंदे साहेबांनी वैजापूर शहराला झुकते माफ दिले. श्री. रामकृष्ण गोदावरी सह. उपसा जलसिंचन योजनेची कर्जमुक्ती हा अत्यंत जटील असणारा प्रश्न मी मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या मदतीने सोडवू शकलो. लवकरच योजना जलसंपदा विभागामार्फत चालू देखील होईल. मी विधानसभा सदस्य झाल्यानंतर विधानसभेच्या ५ वर्षाच्या काळात १३६ दिवस चाललेल्या अधिवेशनाच्या कामकाजापैकी १३२ दिवस मी उपस्थित राहून मतदार संघाचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. माझ्या ह्या कामाची दखल घेऊन भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मिळाला. अर्थात या पुरस्काराचे मानकरी आपण सर्वच आहात. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या रक्तातून निर्माण झालेल्या हिंदवी स्वराजातील विधानसभेत काम करताना मी सर्वधर्मसमभाव जोपासत काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

त्याचबरोबर मी समाजातील दुर्बल, वंचित, शोषित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. वैजापूर शहरातील राहिलेल्या प्रश्नासाठी व त्यावर कारवायच्या उपयोजनेसाठी मी आतापासूनच प्रस्ताव सादर करून त्याच्या पाठपुराव्याला लागलो आहे. वैजापूर तालुका कृषी, व्यापार, शिक्षण, उद्योग, अध्यात्म, सांस्कृतिक या सर्वच बाबतीत पुढे नेण्यासाठी आपण मला साथ द्याल याची मला पुरेपूर खात्री आहे. पुन्हा एकदा मला आपल्या सेवेसाठी मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, हि नम्र विनंती. धन्यवाद..!

जय महाराष्ट्र..! जय हरि

शेतकऱ्यांना पाठबळ

शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व जाणून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकप्रकारे प्रयत्न. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मेळावे, शेती प्रदर्शन,शासकीय योजनांचा लाभ.नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा.

लोकप्रिय नेतृत्व

लहान थोरांना आपलेसे वाटणारे,जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे,कार्यकर्त्यांना जोडून घेणारे अतिसामान्य जनप्रिय नेतृत्व

सच्चा शिवसैनिक

लहानपणीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा ठाम प्रभाव व त्या विचारांनी प्रेरित होऊन महाविद्यालयीन जीवनापासूनच शिवसैनिक म्हणून कार्यरत.

सामाजिक भान

समाजासाठी काहीतरी करण्याची आत्यंतिक व प्रामाणिक संवेदना आणि तळमळ व त्यातून आरंभली अखंड जनसेवा.

शिवसेनेचा प्रचार-प्रसार

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा व प्रखर विचारांचा वारसा घेऊन गावोगावी शिवसेनेचा प्रचार व मनामनात शिवसेनेचे विचार पोहोचविण्यासाठी गेले ३० वर्ष अथक परिश्रम.

विद्यार्थी सर्वांगिण विकास

शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक अशा सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांची प्रगती साधणे तसेच खेळ, कला, नैतिक मूल्ये, नेतृत्व गुण, ताणतणाव व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशनाचे उपक्रम.

विकास व सुशोभीकरण

वैजापूर मतदार संघाच्या उन्नतीसाठी विविध उपाययोजना करत .वैजापूर शहरातील रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाण्याची सुविधा, उद्याने तसेच सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्याकरण, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी धडपड .

महिला सक्षमीकरण

महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देन्यासाठी विविध उपक्रम.शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजात समान संधी मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, स्वावलंबनाचे मार्ग आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न.

समाजकारण

service-img

शेतकऱ्यांसाठी

  • icon 1 रु. मध्ये पिक विमा
  • icon शेतीसाठी 7.5 एच.पी. पर्यंत मोफत विज
  • icon मागेल त्याला सोलार मोटर पंप
  • icon प्रत्येक गावात गाव फिडर
  • icon नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा)
  • icon अतिवृष्टी व सततचा पाऊस अनुदान
service-img

महिलांसाठी

  • iconमुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • icon महिलांना मोफत एसटी प्रवास
  • icon अन्नपुर्णा योजनेतून वार्षिक 3 गॅस टाक्या मोफत
  • icon मुलींचे मोफत शिक्षण
service-img

कामगारांसाठी

  • iconमध्यांन्ह भोजन योजना
  • icon नोंदणीकृत कामगाराला भांडे व अर्थसाहाय्य
  • icon नोंदणीकृत कामगाराला किट पेट वाटप
  • icon अपघात विमा
  • icon घरबांधणी व लग्नासाठी अनुदान 6000
service-img

सामान्यांसाठी

  • iconमोफत धान्य व आनंदाचा शिधा
  • icon संजय गांधी व श्रावणबाळ योजना
  • icon वयोवृध्द योजना
  • icon कलाकरांना मानधन
  • icon ममुख्यमंत्री सहाय्यता निधी
service-img

युवांसाठी

  • icon10 लाख युवांना प्रशिक्षण व शैक्षणिक भत्ता
  • icon नविन उद्योगामध्ये नौकरीची संधी
  • icon सारर्थी, बारर्टी व महाज्योती योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
service-img

दिव्यांगासाठी

  • iconदिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग
  • icon संजय गांधी योजने अंतर्गत दरमहा रु. 1500/- मानधन
  • icon दिव्यांगासाठी घरकुल योजना
service-img

वारकऱ्यांसाठी

  • iconनिर्मल दर्शन संकल्पना
  • icon वारक-यांना प्रत्येक दिडींस 20,000/-
  • iconअनुदान स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना