project-img

विधिमंडळातील कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त





thumb

परिचय

नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उधार घेता येत नाही,ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर होय. शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा मतदारसंघातील विकासावर आणि जनतेच्या मनावर उमटवणारे रमेश बोरनारे सर हे एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहेत. लहानपणीपासूनच लोकसेवेचा वसा घेतलेल्या आणि प्राध्यापक ते आमदार असा यशस्वी प्रवास केलेला संघर्ष मय प्रवास प्रेरणा देणारा आहे.

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे २७ जुलै १९६६ साली रमेश बोरनारे सर यांचा नानासाहेब बोरनारे आणि भामाबाई बोरनारे या दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बोरनारे सरांना तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत.शेतकरी कुटुंबात जन्मल्याने त्यांना हलाखीची परिस्थिती आणि आईवडीलांच्या कष्टाची जाणीव होत होती.यामुळे कष्ट आणि संघर्ष करण्याची ताकद त्यांना लहानपणीपासूनच मिळत गेली.त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा,चिंचडगाव येथे पूर्ण झाले. पुढील शिक्षणाचा टप्पा त्यांनी वैजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केला आणि १९८२ साली प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण केली.तसेच पुढे त्यांनी १९८४ साली बारावी देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.पुढे त्यांनी बी कॉम पर्यंत चे शिक्षण मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विनायकराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केलं.

दरम्यानच्या काळात त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन स्वतःचा खर्च भागवत शिक्षण पूर्ण केले आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावला हे विशेष. १९९२ साली सरांचा विवाह कन्नड येथील श्री.रामराव गर्जे यांची कन्या संगीताताई यांच्याशी पार पडला. त्यांना ऐश्वर्या व गौरी या दोन कन्या असून ऎश्व्र्याचा विवाह नगर विकास विभागातील उच्च पदस्थ अधिकारी श्री.युवराज प्रल्हाद चव्हाण यांच्यासोबत झाला . या सर्व काळात आणि आमदार झाल्यापासून आजतागायत बोरनारे सरांना बंधू संजय बोरनारे यांची कायम साथ मिळाली. जसे प्रभू श्रीरामाच्या सुखासाठी भाऊ लक्ष्मणाने स्वतःला समर्पित केलं अगदी त्याचप्रमाणे बंधू संजय बोरनारे यांनी बोरनारे सरांची साथ कायम निभावली आहे

thumb

राजकीय संघर्षगाथा

१९८६ साली बोरनारे सरानी विद्यार्थी संसदेत ग्रामीण भागाचं नेतृत्व करून खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाची मुहूर्तमेढ रोवली. यासोबतच शिक्षण हाच उन्नतीचा मार्ग आहे हे समजल्यानं त्यांनी इतर कामांसोबतच शिक्षण देखील सुरु ठेवलं आणि १९९१ मध्ये देवगिरी महाविद्यालयातून एम कॉम ची पदवी पूर्ण केली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची दखल घेत १९९२ साली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळानं त्यांना शिवाजी महाविद्यालय,परभणी येथे सिनियर कॉलेज ला प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं. पुढे मुक्तानंद महाविद्यालयात देखील त्यांनी चार वर्ष प्राध्यापक म्हणून काम पहिलं.

लहानपणापासूनच हालाखीच्या परिस्थितीतून झालेली घडवणूक,कष्टाची तयारी आणि जनसेवेची असलेली तळमळ यामुळे बोरनारे सरांचे कार्य अविरतपणे सुरूच होते,त्यांनी चिंचडगाव येथून शिवसेना शाखाप्रमुख म्ह्णून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. शाखाप्रमुख म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन २००० साली त्यांची शिवसेना शहरप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी पक्ष संघटना बळकटीकरण व जनतेचे प्रश्न यासाठी स्वतःला झोकून देत काम केलं. यामुळे २००७ साली त्यांची नियुक्ती शिवसेना तालुकाप्रमुख पदावर करण्यात आली.

वर्षभराच्या अवधीतच त्यांनी '' गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक '' ही संकल्पना राबवून शिवसेनेचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली. सर तालुकाप्रमुख असताना लोकाभिमुख कामांसाठी प्रसिद्ध झाले. गोळवाडी आणि जरूळ येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाला जीवनदान देण्याचं कार्य देखील त्यांच्या हातून घडलं. याव्यतिरीक्त मतदारसंघातील एका युवकांनं बहिणीच्या लग्नाच्या विवंचनेतून आत्महत्या केली असता आमदार बोरनारे सरानी स्वतः भावाची भूमिका निभावत त्या बहिणीचं लग्न स्व: खर्चातून लावून दिलं. अशा विधायक कार्यातून बोरनारे सरांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पप्रत्यक्षात आमलात आणला. बोरनारे सरांच्या कार्याची पोचपावती म्हणून २०१२ साली चिंचडगावच्या सरपंच पदी त्यांची बिनविरोध निवड झाली. या काळात त्यांनी विकासगंगा गावात आणून त्यांनी गाव व परिसराचा कायापालट केला.२०१४ साली त्यांनी आई भामाबाई बोरनारे यांच्या प्रथम पुण्यासमरणाचं औचित्य साधून वैजापूर तालुक्यासाठी स्व:खर्चाने रुग्णवाहिकेची सेवा सुरु केली. सरांच्या लोकसेवेमुळं ते २०१७ साली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत घायगाव गटातून जिल्ह्यांमधून सर्वाधिक मतांनीं निवडून आले. त्यानंतरही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली.

thumb

वैजापूरच्या जनतेसाठी समर्पित

बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिवसैनिक अशी ओळख व अविरतपणे सुरु असलेल्या कार्याची दखल घेत प्रा. रमेश बोरनारे सरांना २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत बोरनारे सर ६०००० मतांच्या फरकाने निवडून आले. एकूण ९८९७२ मते मिळवत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या यादीत राज्यात १६ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले.आमदार झाल्यावर मतदारसंघात रात्री अपरात्री कुठेही अपघात झाल्यास सर्वात आधी पोचणारा माणूस म्हणजे आमदार बोरनारे सर अशी त्यांची ख्याती पसरली .वेळप्रसंगी धावून येणारे देवदूत अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

thumb

अध्यात्मिक विचारांचा वारसा

बोरनारे सरांवर ह.भ.प. ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या धार्मिक विचारांचा मोठा प्रभाव असल्यानं त्यांनी सरला बेट येथे कोट्यवधींची विकासकामं केली. वैजापूर येथे आयोजित वैकुंठवासी ब्रह्मलीन श्री.गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे स्वतः अध्यक्षपद भूषवून सरांनी या सप्ताहाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घडवून आणली.

thumb

व्रत जनसेवेचे,जनतेच्या कल्याणाचे

मुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री.एकनाथजी शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार बोरनारे सरांनी विविध योजनांच्या माध्यमातून वैजापूर गंगापूर मतदार संघाचा विकास साधला. वैजापूर तालुक्याला हक्काचा साखर कारखाना व ३० वर्षांपासून प्रलंबित असलेलय रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजनेची ६५ कोटी रुपयांची कर्जमाफी ,वैजापूर गंगापूर वॉटरग्रीड योजना तसेच नारंगी सारंगी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. तालुक्यातील शनीदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून यशस्वी पाठपुरावा केला. याचबरोबर वैजापूर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे नवीन कार्यालय क्रमांक MH 57 यास शासन मान्यता मिळऊन देण्याचे महत्वाचे काम केले.

मतदार संघात पक्क्या रस्त्यांचे जाळे,अरुंद रस्ते,पेव्हर ब्लॉक बसवणे इत्यादी कामे देखील त्यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केली. याव्यतिरिक्त त्यांनी शेती ,आरोग्य आणि इतर क्षेत्रात त्यांनी विकास साधला. या सर्व विकास कामांसाठी आमदार बोरनारे सरांनी जवळपास ३००० कोटी रुपये इतका प्रचंड निधी शासनदरबारातून मंजूर करून आणला आणि तो विकासकामांवर खर्च केला

thumb

माणूस हक्काचा,वसा कार्याचा

राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून नागरिकांचे ,ग्रामस्थांचे,शेतकऱ्यांचे ,महिलांचे ,युवकांचे ,सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकडं आमदार प्रा. रमेश बोरनारे सरांचा कल जास्त आहे . मतदार संघातील प्रश्न घेऊन आलेल्या प्रत्येकाला आपला प्रश्न फक्त बोरनारे सरच सोडवू शकतात हा विश्वास निर्माण झालाय. विकासाचे आणि समस्या सोडवण्याचे श्रेय घेण्यापेक्षा समस्या सुटल्याचे समाधान हीच आपल्या खऱ्या कामाची पावती असल्याचा विश्वास आमदार बोरनारे सर व्यक्त करतात. शासनाचे पाठबळ,सहकाऱ्यांची साथ,प्रचंड इच्छाशक्ती आणि मतदारसंघातील मायबाप जनतेचा आशीर्वाद विधायक कामे करण्यासाठी प्रेरित करत असल्याची प्रामाणिक भावना आमदार प्रा. रमेश बोरनारे सरांच्या मनामध्ये आहे. नागरिकांचा हाच आशीर्वाद आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची साथ त्यांना कायम राहील व वैजापूर गंगापूर मतदार संघ विकासाची घौडदौड अशीच सुरु ठेवेल यात शंका नाही.